हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
हिमायतनगर। येथील गणेश चौकात स्थापन करण्यात आलेल्या विश्वकर्मा दुर्गा मंडळाच्या वतीने आज होम हवन करण्यात आल्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी विश्वकर्मा दुर्गा मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक उपक्रम राबवित महिला मंडळाच्या सहभागातून नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यंदा दुर्गा मातेची आकर्षक व भव्य मूर्ती घटस्थापना दिनी पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत स्थापना करण्यात आली. दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती व प्रसाद दिला जातो, त्या पार्श्वभूमीवर आज अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्ती समोर होमहवन करण्यात येऊन त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिक परमेश्वर कासार, प्रदीप संगणवार, कुणाल राठोड, संजय चरलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुन्ना पंचमासे, बबलू डांगे, अभिषेक सोमेवाड,नडवरे सर, राजू चरलेवाड, रामू खडके, उत्तम खडके, गोपीनाथ डोईफोडे, अमोल कोटूरवार,जीवन घोगरकर, डॉ आगलावे, नंदूअप्पा पळशीकर, श्याम जुन्नवार, गजानन मागुळकर, ज्योती पार्डीकर, प्रगती संगणवार, सुरेखाबाई पळशीकर, वैशाली ढोणे, विमलबाई भंडारे, कौशल्ये पोपुलवाड, सुनीता पंचमासे, रजनी चाफेकानडे, संतोषी चरलेवाड, स्नेहा पेंटवाड, यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ठेवण्यात आलेल्या पुरी, शिरा, पिठलं प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.