नांदेड। तरोडा बुद्रुक येथील परिसर अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण सोसायटी-विकास नगर येथे 2 ऑक्टोबर दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी सोसायटीचे सचिव परमेश्वर दिपके, कोषाध्यक्ष पांडुरंग तारू, सल्लागार मनोहर भास्करे, शामरावजी हाटकर, शंकर इरलोड, कांबळे, सोपान गायकवाड, मिलिंद व्यवहारे, आठवले, सुमेध पाईकराव, तेलंग, आठवले आदींची उपस्थिती होती. नगरातील मुख्य रस्त्यालगद दोन्ही बाजूंनी लेवल करून साफ-सफाई करण्यात आली. हनुमान मंदिर परीसर, पाण्याची टाकी परीसर स्वच्छ करून जमिनीचे लेवल करण्यात आले.
रोडच्या दोन्ही बाजूंनी चुरी टाकून रस्ता समतल करण्यात येणार आहे. तसेच शोभिवंत झाडे लावून वृक्षारोपण कराण्यात येईल. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ कमान करणे, टाकी परिसरात 500 मीटर वॉकिंग ट्रॅक बनविणे, बालउद्यान, सोसायटीत सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, वृध्द नागरिकांसाठी बसण्यासाठी चेअर बसविणे, टाकी परिसरात मोठे फोकस बसविणे ही सर्व कामे करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्याम दवणे, सचिव परमेश्वर दिपके व संचालक मंडळांनी दिली आहे.