‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - NNL


नांदेड|
थोर स्वातंत्र्य सेनानी, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांचा दि. ०३ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठ प्रांगणातील पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चंदनहार आणि त्यानंतर स्वागत कक्षामध्ये पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, एफ.टी.आय.आय. पुणे. चे संचालक संदिप शहारे, पंकज सेक्शना, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, प्रा. डॉ. एम.के. पाटील, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, शिवराम लुटे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी