उस्माननगर, माणिक भिसे। जुन/ जूलै २०२२ मध्ये उस्माननगरसह परिसरात मुसळधार व संततधार पावसामुळे,विज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जिवित हानी झाली होती.यामध्ये मेंढ्या,बैल,म्हैस जनावरे मयत झालेली होती.उस्माननगर मंडळार्तगातील उस्माननगर येथील (३) शिराढोण येथील (२) भुत्याचीवाडी ,बामणी ,लाठ खु. ,भंडारकोमठ्याची वाडी ,संगुचीवाडी येथील दहा लाभार्थ्यांना मदतीचे चार लाख तीस हजार रुपये चेकचे वाटप कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हास्ते दिवाळीच्या तोंडावर वाटप ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.
जून/जूलै २०२२ मध्ये उस्माननगर व परिसरात संततधार व मुसळधार पावसाने हहंकार केला होता.अनेकाचे घरे कोसळले होते.काहीजनाचे शेतात असलेल्या बैलजोडी , म्हैस यांचा मृत्यू झाला ,तर माळरानावरील मेढ्या अक्षरशः तडफडून मेल्या होत्या. शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले ,. त्यानुसार कंधार चे कर्तव्यदक्ष तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सुचनेनुसार संबंधित महसूल प्रशासन यंत्रणा कामाला लागून पंचनामे करून शासनाने पाठवून दिले होते.
शासन दरबारी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाठपुरावा करून उस्माननगर व परिसरातील शिराढोण ,भुत्याचीवाडी ,पांगरा ,अदी दहा लाभार्थी यांना मदतीचे म्हणून सर्वांना मिळून चार लाख तीस हजार रुपयाचे चेक वाटप करण्यात आले.निसर्गाने हिरावून नेले ..., अन् आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आणून दिले ....असी विधानसभा मतदार संघांमध्ये चर्चा रंगत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर धनादेश मिळाल्याने मयत जनावरांच्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.यावेळी सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड ,कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मंडळधिकारी सतिश शिंदे ,सौ.सिमा कदम ( तलाठी सजा उस्माननगर) रेणके ( तलाठी सज्जा शिराढोण ) मन्मथ थोटे गुरुजी (समन्वय पं.स.कंधार) कोतवाल करंडे , ग्रामपंचायत मधील सेवक कर्मचारी ,ग्रा.पं.सदस्य, नागरिक, शेतकरी, उपस्थित होते.