नांदेड। सिडको शेजारील असलेल्या औधोगीक वसाहातीतील कारखान्यातुन निघणाऱ्या राखेचे प्रदूषण बंद करा अन्यथा सिडको भाजपा मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कडे करण्यात आली असुन या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात, सिडको परिसरा लगत असलेल्या एमआयडीसी परिसरातील सत्यसाई ऑईल इंडस्ट्रीज अॅन्ड रेफायनरी, कोहीनुर फिड्स लि,कपिल ऑईलमिल गुंडेगाव या कंपन्याद्वारे सिडको- हडको परिसरात होणारे प्रदुषण अतिशय घातक असल्यामुळे परिसरातील नागरीकांना अनेक प्रकारच्या रोगराई पसरत आहेत.घातक अशी घुळ सिडको-हडको व गुंडेगाव परिसरात पसरत आहे.
त्या धुळीपासून कॅन्सर, दमा व वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.त्यामुळे या कारखान्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही करुन सर्व सिडको-हडको व गुंडेगाव येथील नागरीकांना या धुळीपासून मुक्त करावे,धुळ बंद झाली नाही तर सिडको-हडको व गुंडेगाव नागरीकांच्या वतीने सिडको शहरात व आपल्या कार्यालयात सिडको भाजपाच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, नगरसेविका सौ. बेबीताई जनार्दन गुपीलेजनार्धन ठाकूर, संतोष वर्मा, भिमराव हंबर्डे, सदानंद कुरे,विशाल पारडे,भीमराव हंबर्डे, कल्याण येजंगे,राजेंद्रसिंह गहलोत, धीरज स्वामी,प्रभाकर डहाळे,भुजंग मोरे,बंटीसिंग बडगुजर,जनार्धन गुपिले,निर्गुणा क्षीरसागर, श्याम नायगावे,महेंद्र तरटे, प्रमोद काळेवाड,एकनाथ रायपतवार, यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.