ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात/नांदेड जिल्ह्यात दहा महिन्यात ११९ शेकऱ्यांनी केल्या आत्महत्या -NNL


नांदेड।
नांदेड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आपलं जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना बळीराजा मात्र आसमानी संकटात सापडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकं भुईसपाट झाली आहेत. तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला शासनाकड़ून मदत मिळाली नाही. यामुळे आता दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न बळीराजासमोर उभा टाकला आहे.

एकीकडे राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केलेली असताना आत्महत्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडयातील नांदेड जिल्हयात दहा महिन्यात 119 तर, या चार महिन्यात ६८ शेतक-यांची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. नांदेड जिल्हयात यंदा जुनच्या सुरवातीपासूनच मोठयाप्रमाणत अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठिण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. नांदेड जिल्हयात ३ लाख ५८ हजार ७३१ हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यात सहा लाख शेतक-यांना फटका बसला आहे. सार्वधिक नुकसान किनवट तालुक्यात झाले असून, सुमारे ४९ हजार ३३२ हेक्टरवरील सोयाबिंज, कापूस, तुर, मूंग,उडित पिके भुईसपाट झाली आहेत.

त्याखालोखाल हिमायतनगर तालुक्याचा नंबर लागत असून या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. पिकांच म्हणाव तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नदीकाठवरील शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. आजूनही हिमायतनगर, किनवट, माहूर याभागात शेतात पाणी साचलेले दिसून येते. लागवडीचा खर्चही निघणे शक्य नसून घेतलेले बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत शेतकरी आहेत. मागील दोन ते तीन वर्षापासून शेतक-यांना नापिकीला तोंड दयावी लागत आहे. 

त्यात आता पुन्हा परतीच्या पावसाने ज्यांच्याकडे शिल्लक पिक आहे तेही खराब झाले आहे. विजया दशमीपासून जिल्हा दररोज मध्यम ते हलक्यास्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचून रहात आहे. सोयाबीन काढणीला अडथळा निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटत असल्याचे चित्र आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावरतरी शेतकऱ्याना  सरकारकडून मदत मिळेल.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी