उस्माननगर, माणिक भिसे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने उस्माननगर येथे स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य किटचे दिवाळी निमित्ताने वाटप करण्यात येणाऱ्या आनंदा शिधा जिन्नस किटचे वाटप उस्माननगर येथील तिन्ही स्वास्थ्य धान्य दुकानातील मिळून एकूण शिधापत्रिका धारकांना ( ११२७) एक हजार एकशे सताविस किट उपलब्ध झाल्या असून तिन्ही दुकानातून संबंधित राशन कार्ड धारकांना वाटपास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न नागरी पुरवठा विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा नुसार दिवाळी सणाच्या निमित्ताने आनंद शिधा जिन्नस वाटप स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी वाटपास सुरुवात करण्यात आले आहे.
उस्माननगर येथे एकूण तीन स्वस्त धान्य दुकान असून त्यापैकी व्यंकटराव दगडोजी सोनटक्के यांच्याकडे तीनशे तीस ( ३३०) , आनंदराव पाटील घोरबांड यांच्याकडे पाचशे सात (५०७) ,से.स.सो.येथे दोनशे नव्वद ( २९० ) असे एकुण अकराशे सताविस राशनकार्ड धारकांना वाटपाचा कार्यक्रम चालू केला आहे.
राज्यातील गोरगरिबांच्या घरोघरी दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने " आनंदाचा शिदा " ही योजना राज्याच्या विविध कानाकोपऱ्या पर्यंत पोहचणविण्यात यश दिसून येत आहे.स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयांत १ किलो साखर ,एक किलो रवा , एक किलो चनादाळ, एक किलो पामतेल थैली असे किट शासनाने उपलब्ध करून दिले आहे.कोरोनासारख्या आव्हानात्मक काळात ही केंद्र सरकारने गोरगरिबांच्या घरोघरी धान्य पोहचेल याची काळजी घेतली.
"आनंदाचा शिधा " हा अत्यंत महत्त्वाकांक्षी व लोकखल्याणाच्या दृष्टीने आवश्यक असा निर्णय शासनाने घेतला.ऑनलाईन नोंदणीसाठी यात असलेला अडसर लक्षात घेता , शासनाने तो दूर केला , असून आनंदाचा शिधाचे वाटप ११२७ शिधापत्रिका धारकांना गावातील तीनही दुकानातून वाटप करण्यात येत असून लाभार्थी गर्दी उसळत आहे..