भोकर| तालुक्यातील मौजे रायखोड या गावात भावाने भावावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शेतीच्या वाटणीच्या कारणावरून घडला असून, याप्रकरणी भोकर ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भोकर तालुक्यातील मौजे रायखोड या गावचे लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड हे आपल्या शेतात बसले असताना माझ्या शेतात कसा बसला. अशी विचारणा त्यांचा भाऊ सूर्यकांत माधवराव आलेवाड याने केली. यातून वाद घालत सूर्यकांत माधवराव आलेवाड, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा देवराव सूर्यकांत आलेवाड या तिघांनी लक्ष्मीकांत आलेवाड याना धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली पडून त्यांच्या तोंडात विष ओतले.
त्यामुळे फिर्यादीने आरडाओरड केली असता हे ऐकून लक्ष्मीकांत आलेवाड यांचा मुलगा, आई व पत्नी धावत आले तेव्हा खून करण्याच्या प्रयत्नात असलेले तिघेजण पळून गेले. या संदर्भात लक्ष्मीकांत आलेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपीवर कलम 307, 504, 506, 34 भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२२ रोजी घडलेल्या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कराड हे करत आहेत.