हदगाव। दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्रीतील गुल होणे या प्रकारामुळे नागरिकांना सध्या ऐन दिवाळीत विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून, महावितरणच्या बेपरा कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ऐन सणासूदीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. मात्र विजे अभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत. असा काहीसा प्रकार सध्या हदगाव शहरात व ग्रामीण भागात सुरू आहे. सध्या सणासुदीचे दिवस असताना दिवाळी रोषणाईचा सण आहे. पण विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा सण अंधारात साजरा करण्याची वेळ शहरवासीयावर आल्याची दिसत आहे. दिवाळी सणामध्ये नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात त्यामुळे शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापारी वर्ग तसेच नागरिकांना या विजेच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.
महिला भगिनी या वर्षाच्या सणासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत असतात. परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो. फक्त दिवाळीच नाही तर कायमस्वरूप लाईटची नियोजन विद्युत वितरण कंपनीने करावे असे नागरिकांतून बोलले जात आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या भेसळ नियोजनामुळे ग्रामीण भागातील आष्टी परिसरात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून निमगाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड निर्माण झाली आहे.
यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे विशेष करून चांभार वस्तीत विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे सध्या सणासुदीचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे पण महावितरणच्या ढिसळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही
वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. तसेच वेगवेगळ्या उद्योग असणाऱ्या नागरिक व दुकानदार व्यवसायिकांची ही अडचण झाली आहे. एकूणच सर्व कामकाजांवर विपरीत परिणाम होत आहे अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यापासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन अभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभे टाकले आहेत...