लोहा| तालुक्यातील शेतकऱ्यांनी केवळ ३६ टक्के ई -पीक नोंदणी केलेली आहे अजून ४२ हजार हेक्टर वरील पीक नोंदणी ऑनलाइन करणे शिल्लक आहे शासकीय अनुदानासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई पीक नोंदणी केली नाही त्यांनी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
लोहा तालुक्यातील शेतीतील शिल्लक क्षेत्र व खातेदार यांची ऑनलाईन ई पीक नोंदणी करणे बाबत शेतकऱ्यांना तहसीलदार मुंडे यांनी आवाहन करताना सांगितले की लोहा तालुक्यातील ई पीक पाहणी केवळ ३६ % झाली असुन अदयाप ४२ हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक नोंदणी करणे बाकी आहे पीक विमा व ईतर शासकीय अनुदान साठी ई पीक नोंदणी महत्वाची आहे.
तरी सर्व शेतकरी यांची ई पीक नोंदणी पूर्ण करून घेण्यात यावे.आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रगतीशील शेतकरी, सरपंच , उप सरपंच , चेअरमन , पोलिस पाटील , रास्त भाव दुकानदार , विद्यार्थी , कोतवाल यांचे मदतीने स्वंयसेवक गट तयार करुन पीक नोंदणी करिता सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत एका मोबाईलवर १०० खातेदार यांची नोंदणी करता येते. प्रत्येक गावात किमान १० ते १५ volunteer ई पीक नोंदणी करिता नेमावेत असे तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवक या सर्वांना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आवाहन केले आहे
ई पीक नोंदणी साठी तहसीलदार शेती बांधावर - शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करणे गरजेचे आहे. तालुक्यात 42 हजार हेक्टर जमिनीवरील पीक पेरा नोंद झाली नाही. शासकीय अनुदानासाठी ई -पीक नोंदणी आवश्यक आहे. असे आवाहन करतानाच तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे स्वतः शेतात जात आहेत व शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी प्रात्यक्षिक द्वारा सांगत आहेत.