हदगाव| आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबवून आदिवासी समाजाचा विकास करणे अभिप्रेत असते परंतु यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक योजनांचा लाभ मिळत नसल्याने अभिप्रेत असलेला विकास होत नाही म्हणुनच त्यामुळे मा. अप्पर आयुक्त अमरावती यांना कीनवट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या अपर आयुक्त यांच्याशी हादगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी एका निवेदनातून याबद्दल आपले निवेदन सादर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,प्रामुख्याने भारत सरकारचे शिष्यवृत्ती 2021- 2022 या वर्षातील काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले आहेत त्याकरता पुन्हा डीबीटी पोर्टलवर संधी उपलब्ध करून द्यावी , ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत कामाची वितरण व मंजुरी ही प्रकल्प कार्यालय स्तरावरून वितरित करून मंजुरी देण्यात यावी, आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह करता इमारत बांधकामासाठी तात्काळ जागा निश्चित करुण इमारत बांधकाम करण्यासाठी तत्काळ मंजुरी देण्यात यावे.
वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया विना विलंब करून कोणत्याही शाखेचा निकाल लागल्या नंतर तीस दिवसाच्या प्रवेश पत्रिका न करावी जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार नाही, वस्तीगृहाला पुरवठा केलेले पुस्तक वाटप विद्यार्थ्यांना मागताच उपलब्ध करून द्यावे, नर्सिंग सारख्या कॉलेजने कोणतीही फी घेऊन हादगाव येथील एका नर्सिंग कॉलेज ने मुलीकडून शिष्यवृत्ती शिवाय 30 ते 35 हजार रुपये फी आकारणी केली आहे.
त्याची चौकशी व्हावी व फीचा तपशील समजून घ्यावा, आश्रम शाळा केदारगुडा येथील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पालक अधिकारी श्री बोरडे जोशी यांच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई व्हावी, हदगाव येथील तत्कालीन गृहपाल श्री बिचके यांच्या कामातील अनियमितपणा व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरल्यामुळे यांना तात्काळ त्यांच्या मूळ वेतनावर आणण्याचा प्रस्ताव मंजूर करावा , जलधरा येथील आश्रमशाळा विषबाधा प्रकरणातील दोषीवर तात्काळ कारवाई करावी असे मागण्याची निवेदन अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
यावेळी आंध आदिवासी समाज संघटना हदगाव , आदिवासी युवक कल्याण संघ हदगाव, आफ्रोट कर्मचारी संघटना हिमायतनगर आदी संघटनेच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले यावेळी यावेळी उपस्थिती ॲड. रामदास डवरे , शंकर मेंडके, राम मिराशे, बुरकुले डी. के.,संजय माझळकर, किशोर सरकुंडे, शंकर भिसे, संतोष डवरे, जीगाजी वानोळे, विठ्ठल धुमाळे, सुभाष गारोळे आदी उपस्थित होते.
"आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे, यात कोणताही कर्मचारी कामचुकारपणा करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही,"- श्री. सुरेश वानखेडे,अपर आयुक्त अमरावती