नांदेड। विविध क्षेत्रातील बुद्धिमत्ता विकत घेता येते इमानदारी कुठून विकत आणणार आहात असा सवाल पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात जिल्हायुवा व उत्सव 2022 या कार्यक्रमात "नागरिकोमे कर्तव्य की भावना" या विषयावर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जाधव, युवा नेत्या प्रणिता देवरे (चिखलीकर), नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंडकर पुढे म्हणाले की, ज्ञान आणि बुद्धिमत्ता ही दुधारी शास्त्रासारखी आहेत. त्याचा जसा वापर कराल तसा उपयोग होईल. हल्ली बाजारीकरणात ज्ञान आणि बुद्धिमत्ता विकत घेता येते. चांगला डॉक्टर त्यांची शुल्क अदा करून त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानाचा वापर अधिक शुल्क देऊन त्याचे ज्ञान,अनुभव, कौशल्य विकत घेता येणे शक्य झाले. हीच अवस्था विधी अर्थात कायदेविषयक,शिक्षण विषयक इत्यादी क्षेत्रात आहे. हल्ली बुद्धिमत्ता ही सहज विकत घेता येते इमानदारी कशी विकत घेणार आहात? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
मुंडकर पुढे म्हणाले इमानदार माणूस इमानदार माणसाचा सहवास अधिक ठेवण्याचा प्रयत्न करतो नव्हे तर त्यास तो प्रिय असतो. पण.... बेईमान माणूस स्वतःजवळ बेईमाणूस ठेवण्यासाठी तयार नसतो. अशी ही महत्त्वपूर्ण असलेली इमानदारी आणि कर्तव्याची भावना ही हल्ली लोप पावत चालली. यामुळेच अशांती आणि विकृती तसेच विध्वंसक प्रवृत्ती वाढत चालली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विद्यार्थी दशेत घ्यावयाची काळजी आणि त्यांच्या विद्यार्थी अवस्थेतील महत्त्वपूर्ण बाबी प्रगट करत विद्यार्थ्यांना ऊर्जावान राहण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी विशद केल्या. कमी शब्दात अत्यंत प्रभावी अशी मांडणी जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी केली. युवा नेत्या प्रणिता देवरे(चिखलीकर) यांनी युवकांना मार्गदर्शन करताना देश पातळीवरील आणि राज्य पातळीवरील विविध घटना घडामोडी प्रगट करत देश घडवण्यासाठी युवा घडणे महत्त्वाचे असल्याचे विशद केले.
नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर यांनी युवकांच्या विविध बाबीवर प्रकाश टाकला. देश घडविण्यासाठी युवकांच्या प्रभावी सहभागाविषयी ऊर्जावान आणि प्रभावी अशी मांडणी केली. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जाधव यांनी युवकांच्या मनाचा आणि अभिव्यक्तीचा समावेश करत देश घडवण्यासाठी युवक आणि त्यांच्या कर्तव्याची भावना याविषयी आपले मत सुबोधपणे मांडले. कार्यक्रमाचे दर्जेदार संचलन प्राध्यापक कल्पना जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील युवक, युवती, नागरिक, विविध क्षेत्रातील कलाकार,मोठ्या संख्येने उपस्थित होते.