वाहनचाल व शेतकऱ्यांची होत आहे कसरत
उस्माननगर, माणिक भिसे। येथून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लाठ ( खु) ते उस्माननगर रस्त्याची दुरवस्था झाली असून, येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनचालक व शेतकऱ्यांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे
नांदेड जिल्ह्यात स्मृध्दी महामार्गाचे काम युध्द पातळीवर चालू असून केटी कंट्रक्शन या परिसरातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या मोठ्या वाहनांतून मुरूम नेला जात असताना मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात प्रवाशांचे हाल होत आहे. या ठिकाणी खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. या परिसरातील नागरिकांना नांदेड व उस्माननगर येथे कामासाठी जावे लागत असते.
तसेच येथील नागरिकांचे त्या भागात शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातला माल घराकडे आणताना खुप तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर सतत छोटे मोठे खड्डे पडले आहेत . त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर नेहमी मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खन होत आहे.त्यांच्या जड वाहनांमुळे रस्त्यावर भरधाव चालत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता खराब झाल्यामुळे वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.तरी संबंधित सा.बा.वि. अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.