नांदेड। राज्यात सर्वत्र यावर्षी अतिवृष्टीमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे नांदेड जिल्हासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे.
शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाल्यानचे मुलांचे विद्यार्थ्यांचे शेक्षनिक शुल्क माफ करावे. याबाबतचे निवेदन भारतीय जनता विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नांदेड आदित्य पाटील शिरफुले यांनी मुंबई येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले असता ,मंत्री महोदयांनी हा विषय मंत्रिमंडळासमोर विचारधन असून तो लवकरच घेण्यात येईल असे कळवले.