नविन नांदेड| " संस्कार हे प्रत्यक्ष आचरणातून आपोआप रुजले जातात आणि विद्यार्थी दररोज गणवेशात शाळेत उपस्थित राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्काराची रुजवणूक होते. शासकीय योजनेतून इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशक्य असल्यामुळे विष्णुपूरी प्रशालेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा माझा मानस होता व तो मी पूर्ण केला,यात मला खूपच समाधान प्राप्त झाले आहे.
जि.प.हा.विष्णुपूरीच्या वतीने नुकताच भार्गव विजयकुमार राजे ,अनिकेत प्रदीप मोदी व सौ.मिरा धनंजय वट्टमवार-रेवणवार अशा तीन दात्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. या तीन दात्यांनी दोनशे विद्यार्थिंना स्वखर्चातून गणवेशाचे वितरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथराव हंबर्डे, उपसरपंच हे होते तर विशेष मार्गदर्शक अतिथी शंकरराव हंबर्डे, सचिव काळेश्वर संस्थान, राजेश हंबर्डे, गोविंदराव माधवराव हंबर्डे, कमलाकर हटकर, गोविंदराव शंकरराव हंबर्डे, मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक तथा सर्व शिक्षक,बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी सर्व सन्माननीय दात्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. यासमयी पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षिका सौ.अर्चना देशमुख यांचाही सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
आजच्या सत्काराचे औचित्य साधून भार्गव विजयकुमार राजे यांनी प्रशालेस अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीचा मएक एल.सी.डी.प्रोजेक्टर देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार कृष्णा बिरादार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, एम.ए.खदिर, आनंद वळगे, पद्माकर देशमुख, सौ.पंचफुला नाईनवाड, श्रीमती चंद्रकला इदलगावे, सौ.संत,सौ.उज्ज्वला जाधव,सौ.कांचनमाला पटवे,सौ.वैशाली कुलकर्णी,दत्ता केंद्रे, प्रविण सूर्यवंशी व विकास दिग्रसकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.