मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘पंढरीची वारी’ प्रदर्शनास भेट -NNL


मुंबई|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘पंढरीची वारी’ छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली.  मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि सामाजिक कार्यकर्ते, कलासंग्राहक परवेज दमानिया आणि रतन लुथ यांच्या संकल्पनेतून पंढरपूरच्या वारीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळालेले छायाचित्रकार आणि पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचा आज समारोप झाला. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यास जातात.  छायाचित्रकारांनी वारक-यांचा भाव आणि तेथील क्षणचित्रे टिपून संपूर्ण वारीचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घडविले.

छायाचित्रकार शांतनू दास, महेश लोणकर,पुबारून बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे, ज्ञानेश्वर वैद्य, प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले, शिवम हरमलकर यांच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी