वंचित बहुजन आघाडीची नांदेड उत्तर कार्यकारिणी जाहीर -NNL

तालुकाध्यक्षपदी मुकुंद नरवाडे तर महासचिव शेख सलीम


नांदेड|
वंचित बहुजन आघाडीची बैठक विसावा पॅलेस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रवक्ता फारुख अहेमद, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निरंजनाताई आवटे, सुनील सोनसळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत नांदेड उत्तर तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी सर्वानुमते जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अशी- तालुकाध्यक्ष मुकुंद रामजी नरवाडे, महासचिव शेख सलीम, उपाध्यक्ष राजेंद्र वगर, महासचिव ईश्‍वर नारायण जनकवाडे, संघटिक मारोती वाघोळे, उपाध्यक्ष बालाजी सावंत, धाराजी हिंगोले, सचिव नंदकुमार नरवाडे, उपाध्यक्ष शंकर गायकवाड, सचिव कृष्णा भोसले, संपर्क प्रमुख प्रेमचंद चवणे, सहसंघटक सुरेश मेटकर, तर सदस्यपदी रमेश लोणे, सय्यद तयब अली, दशरथ पोहरे, राजू नरवाडे, आनंदा खंदारे, प्रदीप पाटील, संभाजी चुनचुनवाड, इस्ताक शेख गुडीमिया, दिलीप हिंगोले, हणमंत पाटणे, विष्णू भोसले  आदींची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी