नांदेड| येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या काव्य पौर्णिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आश्विन पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या काव्य पौर्णिमा अंतर्गत धम्म काव्य मैफिल संपन्न झाली.
यावेळी प्रा. रेखाताई ढगे, इंजि. पी. एन. पडघणे, इंजि. डी. डी. भालेराव, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले, शिवाजी सावते, प्रकाश ढवळे , नागोराव डोंगरे, थोरात बंधू, संयोजक सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती.
शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात रमामाता महिला मंडळाच्या वतीने आश्विन पौर्णिमेचे औचित्य साधून 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथवाचन समारोप प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात पी. एन. पडघणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्रिसरण, पंचशील, त्रीरत्न वंदना, भीमस्मरण गाथा पठणानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाची ६२ वी काव्य पौर्णिमा साजरी झाली. त्यात शिवाजी सावते, प्रकाश ढवळे , नागोराव डोंगरे, थोरात बंधू, काव्य पौर्णिमेचे संकल्पनक प्रज्ञाधर ढवळे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार सुभाष लोखंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळबाजी थोरात, धोंडीबा लांडगे, अॅड. अनिल सदावर्ते माणिकराव हिंगोले, नामदेव दिपके, अनिल निखाते, गणेश हटकर, अशोक खाडे, मंगेश खाडे, विजय पंडित, नामदेव गोडबोले, देवानंद नरवाडे, वसंत हाटकर, रमेश सातोरे, संतोष नरवाडे, सुनील कोकरे, सुभाष नरवाडे, मिलिंद हिंगोले, अमृतराव पवार, सिद्धार्थ हाटकर, विपिन हिंगोले, अरविंद ढगे, संघपाल गोडबोले, रमा माता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर गिरजाबाई नवघडे, भिमाबाई हाटकर, शोभाबाई गोडबोले, पंचफुलाबाई कोकरे, रेणुकाबाई गजभारे, सखुबाई हिंगोले, महामाया येवले, शेषाबाई धुळे, पद्मिनीबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, रेखाबाई हिंगोले, सविताबाई नांदेडकर, शिल्पा लोखंडे, सुमनबाई वाघमारे, नानाबाई निखाते, अनिताबाई नरवाडे, आम्रपाली कोकरे, भागीरथाबाई थोरात आदींनी परिश्रम घेतले.