कृषिक जमिनीला अकृषीक दाखवीत बनावट दस्तऐवज वापरून शासन जनतेची दिशाभूल करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करा -NNL

जतनबाई शेखावत आश्रम शाळेच्या विरोधात गोविंद शिंदे यांनी दाखल केले न्यायालयात प्रकरण 


हिमायतनगर|
पळसपूर रोडवर असलेल्या शेत सर्वे नंबर 47/2 मधील जागेवर ग्रा.पं. च्या मालमत्ता रजिस्टरला मालमत्तेची नोद नसतांना कृषिक जमिनीला अकृषीक दाखविण्यासाठी आर्थीक देवाण - घेवाणा करुन तत्कालीन ग्रामसेवक यांनी बांधकाम परवानगी व बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे दस्ताऐवज मध्ये हेराफेरी करून बनावट दस्ताऐवज दाखल करत शासन व जनतेची दिशाभूल करून विद्यार्थ्यांच्या नावाने शासनाचा निधी हडपण्याचा प्रयत्न जतनबाई शेखावत आश्रम शाळेच्या संस्थाचालकाने केला असल्याचा आरोप तक्रारकर्ते गोविंद शिंदे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात केला आहे. यास ८ ,हिने उलटून गेले असताना अद्यापही याबाबत कार्यवाही झाली नसल्याने शिंदे यांनी न्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता १५६/३ नुसार संबंधित संस्थाचालक व बनावट दस्तऐवज देणाऱ्या ग्रामसेवक पोलीस कार्यवाही होईल काय...? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

याबाबत गोविद शिंदे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, तत्कालीन ग्रापंचायत कार्यालयात हिमायतनगरची माहिती मागविली असता मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हिमायतनगरची जागा ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालमत्ता अभिलेखावर नोंदीच्या कागदपत्राच्या सत्यप्रती घेतल्या. त्यामध्ये सदरील शाळेची मालमत्ता अभिलेखावर नोंद सौ.इंदिराबाई श्रीराम वाळके यांच्या मालकीची सर्वे क्रं.47/2 क्षेत्रफळ 1 हेक्टर 27 आर पैकी 80 आर जमिनीचे बिगर शेती वाणिजिक प्रयोजनार्थ वापर करण्याची परवानगी (N.A.) दिनांक 06.08.2016 ला मिळाल्यानंतर ( वार्ड क्रं. 17 मालमत्ता क्रमांक 616) घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे.

त्यामुळे तक्रारकर्ते शिंदे यांनी नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे माहिती अधिकार अर्जानुसार संबंधित शाळेचा नमुना नंबर 43, बांधकाम परवानगी आणि N.A. च्या सत्यप्रती मिळविल्या आहेत. त्यानुसार संबंधीत शाळेचा नमुना नंबर 43, N.A. च्या सत्यप्रती आणि बांधकाम परवानगी जा.क्रं. 469 दिनांक 09.01.2015 रोजी तत्कालीन ग्रामसेवक गर्दसवार यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत केलेली असुन, नगर पंचायत कार्यालय यांचे पत्र जा.क्रं.नंपहि/विभाग/वसुली विभाग/ 545/2021 दि.15.06.2021 नुसार सदरील मालमत्ताहि दिनाक 06.08.2016 च्या नंतर मालमत्ता रजिस्टरला नोंद झाल्याचे दिसून येत आहे. त्यापुर्वी म्हणजे दि. 09 जानेवारी 2015 अंदाजे दिड वर्षापुर्वी बांधकाम परवानगी तत्कालीन ग्रामसेवकाने कशी काय..? दिली असा प्रश्न निर्माण होतो आहे.

त्यानंतर नगर पंचायत कार्यालय हिमायतनगर यांच्याकडे सदरील शाळेच्या ईमारतीचे व परीसराचे बांधकाम पुर्ण झालेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत मिळविली. त्यांनुसार जावक रजिष्टर, दस्तावेज पडताळणी केली असता सदरील प्रमाणपत्र निर्गमीत केल्याचे दिसुन येत नाही असे कळविले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर येथून सदरील शाळेच्या व इतर इमारतीच्या मुल्याकंनाच्या सत्यप्रती व त्यासंबंधी सर्व कागदपत्रे माहिती अधिकार नुसार तक्रारकर्ते गोविंद शिंदे यांनी मागीली होती. बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदरील शाळेचे बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जा.क्रं. 519 दिनाक 05.06.2015 ग्रा.पं. हिमायतनगर तत्कालीन ग्रामसेक गर्दसवार यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत झाल्याचे सांगण्यात आले. परंतु नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर यांनी असे बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे दिसुन येत नाही हे यावरून स्पष्ट होते आहे.

यासंबंधी तक्रारदार गोविंद शिंदे यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय, हिमायतनगर यांच्याकडे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात चौकशी करुंन संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी दि.११ फेब्रुवारी 2022 रोजी निवेदन देऊन केली. मात्र या प्रकरणी नगरपंचायतीने कसलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारकर्ते शिंदे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे याना तक्रार देऊन संबंधित प्रकरणी योग्य ती चौकशी करुन तत्कालीन ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि खोटे दस्तऐवज देऊन शासन व जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थेवरही कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. यास आज घडीला ८ महिने उलटून गेली आहेत, मात्र कोणतीही कार्यवाही अथवा चौकशी झाली नाही. त्यामुळे शिंदे यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले असल्याचे सांगितले असून, १५६/३ प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले. आतातरी या प्रकरणी खोटे दस्तऐवज देऊन शासन व जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने संस्थेच्या संचालकांशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर गोविंद शिंदे म्हणाले कि, न्यायालयात १५६/३ प्रमाणे खोटे दस्तऐवज देऊन शासन व जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थेवर व संबंधित ग्रामसेवक गुन्हे दाखल करण्याची मागणीचे प्रकरण दाखल केले आहे. दरम्यान न्यायाधीश महोदयांची बदली झाल्यामुळे नवीन न्यायाधीश साहेबांनी आज घेतला आहे, त्यांनी याबाबत नगरपंचायतीची परवानगी आणावी असे सुचविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी