नादेडच परिवाहन विभाग गाफील
हदगाव, शे.चांदपाशा| वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करित काही स्कुल बस आटो अन्य वाहनातुन शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक करण्यात येत आहे. याबाबतीत शाळेच्या व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. नादेड परिवहन विभाग कार्यरत आहे की..? नाही असा सवाल सध्या तरी हदगाव शहरात व परिसरातील पालक वर्गातून विचारला जात आहे.
हदगाव शहरातुन ईतर तालुक्यात व अन्य बसेस शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाहनातुन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जात आहे. बालवाडी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे काहीशालेय बसेस इतर वाहने धोकादायक परिस्थितीतुन वाहतूक करतांना दिसुन येतात तर काही स्कूल बसेसची तपासणी होणे अत्यावश्यक आहे. परिवहन मंडळाच्या नियमानुसार शालेय बसेस मध्ये 'प्रथमोचार पेटी ' आग्निशमन यंञअसणे अवश्यक आहे.
माञ अश्या नियमाचे पालन होतांना दिसुन येत नाही. परिवाहन विभागाची कार्यशैली पाहता हा विभाग ही या बाबतीत गंभीर दिसुन येत नाही. कारण अश्या वाहनावर परिवाहन विभागाने हदगाव तालुक्यात कारवाई केल्याचे दिसुन येत नाही. यामुळे छोट्या शालेय विद्यार्थ्यांचा हा प्रवास धोकादायक असल्याचे दिसुन येत असल्याने पालक पण पाल्य घरी येई पर्यंत चिंतेत असल्याचे दिसुन येत आहे. कारण पालका समोरही अश्या वाहनातुन पाल्यांना पाठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे आवर्जून ऊल्लेख कारावा लागेल.