नांदेड| येथील भदंय पंय्याबोधि थेरो यांच्या नेतृत्वात धम्म अभ्यास पथक आज थायलंडला रवाना झाले. यात लेखक डॉ. विलास ढवळे, प्रमिला ढवळे आणि इतर 65 जणांचा समावेश आहे.
भदंत पंय्याबोधी थेरो यांचे नांदेड जिल्ह्यात मोठे धम्मकार्य असून खुरगाव येथील धम्मदेसना केंद्रात नियमित श्रामणेर प्रशिक्षण सत्र घेतले जातात. बौद्ध धम्म मानव उन्नतीचा सम्यक मार्ग लोकांना समजावून सांगणे, जागतिक पातळीवरील धम्मचळवळी समजून घेणे, दैनंदिन जीवन अधिक सुखी करण्यासाठी वैश्विक संदर्भातील धम्म समजून घेणे यासाठी ते धम्म देशांतर्गत व देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करतात.
दि.24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या धम्म दौऱ्यात त्यांच्या नेतृत्वात 67 जण सहभागी झाले आहेत. आज हे पथक कलकत्ता मार्गे थायलंडकडे रवाना झाले.