श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान व श्री आई तुळजाभवानी वडार समाज दुर्गा मंडळ हदगाव संयुक्त विद्यमाने आयोजि
हदगाव। दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे मराठवाडा मुलुख मैदानी तोफ म्हणून सर्वपरिचित असणारे श्री संतोष भाऊ देवकर यांच्या संकल्पनेतून हदगाव येथील श्री आई तुळजाभवानी वडार समाज दुर्गा मंडळ व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जपली गेल्या चार वर्ष पासुन सतत श्री आई तुळजा भवानी वडार समाज दुर्गा मंडळच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
यावेळी १३ माताभगिनीनी देखील रक्तदान करून आपली वेगळी छाप पाडली आहे , रक्तदान करण्यासाठी बौद्ध महासभा चे तालुकाध्यक्ष श्री रुपेश गिरबिडे सह शिवभक्त प्रमोद वानखेडे, व्यंकटेश बाभुळकर ,शिवाजी बाभुळकर,गणपत बाभुळकर, बजरंग बाभुळकर, माधव बाभुळकर,तिमा बाभुळकर,सुरेश बाभुळकर सह ५१ शिवशंभु भक्तांनी रक्तदान केले.