नांदेड| भारतीय जनता पार्टीचे महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले.
शहरातील धन्वंतरी कॉलनी येथील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर अध्यक्ष प्रवीण साले, सरचिटणीस अॅड. दिलीप ठाकूर, व्यंकट मोकले, भीमशक्तीचे कुमार कुर्ताडीकर , मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, संतोष क्षीरसागर, मारोती वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते महिला व पुरुष कामगारांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी क्षितिज जाधव राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतूक केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती कामगारांना दिली.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजप पदाधिकार्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. गौरव जाधव, आनंद पावडे, प्रमोद केंद्रे,पप्पू कांबळे, संघकिरण कदम, पप्पू कोल्हे, विजय जाधव, विजय गायकवाड, पंकज खाडे, सुरेश इबीतवर, गणेश शिंदे, कपिल तिमेवार, कोंडेकर, बसवदे, आकाश लेवडे, विजय गायकवाड, व्यंकटेश मेंडके, प्रफ्फुल गिरी, अरविंद गोधने, महेश जोंधळे, मिलिंद आठवले, बोबडे आदी उपस्थित होते.