मुखेड। येथील जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंडवार यांच्या पुढाकारातून मुखेड ते नरसी बालाजी पदयात्रेत जाणाऱ्या भक्तांना फळे वाटप करुन धार्मिक कार्यात सहभाग नोंदविला आहे.
मुखेड ते नरसी बालाजी मंदिर पदयात्रा नवरात्रात गेल्या 23 वर्षापासून निघत असते यंदाचे हे २४ वे वर्ष होते. स्व.बालाजी चौधरी यांच्या संकल्पनेतून ही पदयात्रा सुरुवात झाली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र लक्ष्मीकांत चौधरी व राजेश चौधरी यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली. या पदयात्रेत जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे कोषाध्यक्ष वैजनाथ यांच्या पुढाकारातून पायी दिंडीत जाणाऱ्या सदभक्तांना फराळाचे वाटपाचे नियोजन करत असतात होकर्णा पाटी जवळील टोल नाक्याजवळ फळांचे भव्य स्टॉल लावून जिप्सीचे दमकोंडवार यांनी फळ वाटप केले.
यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, कृऊबाचे सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, राम पत्तेवार, डॉ. अशोक कौरवार, डॉ. राहूल मुक्कावार, डॉ.अविनाश पाळेकर, दिलीप कोडगिरे, संजय कोडगीरे, महेश दमकोंडवार, अनिल पईतवार, यांच्यासह जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, जिप्सीचे विद्यमान अध्यक्ष जय जोशी, कार्याध्यक्ष जिप्सी भूषण बलभीम शेंडगे, सचिव बालाजी तलवारे, सुरेश उत्तरवार, डॉ. सतीश बच्चेवार, उत्तम अमृतवार, हणमंत गुंडावार, नामदेव श्रीमंगले, विठ्ठल बिडवई, गोविंद पाटील जाधव, सुरेंद्र गादेकर, सतीश खोचरे, गिरीश देशपांडे, धनंजय मुखेडकर यांची उपस्थिती होती. जिप्सीच्या या सहभागाचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तलवारे यांनी केले तर सर्वांचे आभार जिप्सीचे अध्यक्ष जय जोशी सर यांनी मानले.