पत्रकार अब्दुल समद यांना पितृशोक
उमरी। उमरी येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिक तथा माजी आमदार कै बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे विश्वासू माजी नगरसेवक म्हणून परिसरात परिचित असलेले अब्दुल लतीफ अब्दुल करीम यांचे वयाच्या ८० व्या नांदेड येथे खाजगी दवाखान्यात निधन झाले.
दि ३१ अक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता उपचार चालु असताना अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा अंत्यविधी दि1/11/2022रोजी दुपारी २ वाजता उमरी येथील ईदगाहा कब्रस्तान करण्यात येणार आहे. त्यांच्या पाश्चात्य पत्नी ,पाच मुले, दोन मुली नातु पणतु असा परिवार आहे ते प्रजावाणी चे पत्रकार अब्दुल समद अब्दुल यांचे ते वडील होत