बिलोली, गोविंद मुंडकर। शहरातील कुंडलवाडी मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या पुर्वेकडील स्टोर रूमच्या एका खोलीला काल दि.३० आक्टोंबर रोजी दुपारी अचानक आग लागली.या आगीत शाळेतील साहित्य जळून खाक झाले. बिलोली शहराची शैक्षणिक अस्मिता असलेल्या शाळेला आग लागल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
गत दशकभरापुर्वी पर्यंत तालुक्यातील प्रतिष्ठित अशी बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल शाळा होती.या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी सर्वच क्षेञात मोठ मोठ्या पदावर काम करत आहेत. बिलोली शहर व परिसरातील अनेकांना ज्ञानदान करून उच्च पदावर नेणारी ही शाळा शहर व परिसरासाठी अस्मितेचे यापूर्वी 14 दिवस शाळेसाठी ही चळवळ राबविण्यात आली होती.यात शहर परिसरातील विद्यार्थी गणमान्यसह राज्य पातळीवरचे शिक्षण प्रेमी आणि शिक्षणतज्ञ सहभागी होऊन या शाळेचा गौरव केला होता.
या चळवळी नंतर अनेक दिग्गज आणि मान्यवर या शाळेविषयी आपली अस्मितेची नाळ असल्याचे व्यक्त केले होते.माञ गत काही वर्षापासून शासनाचे चुकीचे धोरण व लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही शाळा अखेरच्या घटका मोजत आहे.अशात काल दि.३० आक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास या शाळेच्या तळ मजल्यावरील स्टोर रूम मधून अचानक मोठ्या प्रमाणात धुर निघत होता.शाळेतुन धुर निघत असल्याने परिसरातील काही नागरिकांनी याबाबतची माहीती गावातील नागरिक व प्रशासनास दिली.माहिती मिळताच नगर परिषदेच्या कर्मचारी अग्निशमन वाहनासह घटनास्थळ गाठून आग विझविण्यास सुरूवात केली.
बिलोली नगर परिषदेचे अग्निशमन वाहन आग विझवत असताना कुंडलवाडीचे वाहनही पाचारण करून बिलोली व कुंडलवाडी येथील अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी ही आग आटोक्यात आनली.स्टोर रूमला लागलेल्या आगीत शाळेतील जुने लाकडी व अन्य साहित्य जळून खाक झाले. शाळेला दिवाळीच्या सुट्या असल्याने शाळा बंद होती त्यामुळे कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.माञ या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेच्या मागील भिंतीला एखादी व्यक्ती सहज ये जा करू शकेल एवढे मोठे भगादाड पाडण्यात आले .
या शाळेच्या परिसरात यापूर्वी गंभीर अपराधिक घटना घडल्या होत्या. यातुन ये- जा करत शाळेत काही गैर प्रकारतर होत नाहीत ना ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही आग कशामुळे लागली याची अधिकृत माहिती अध्याप प्राप्त झाली नसली तरी ही आग कोण्यातरी व्यक्ती लावली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. बिलोली येथील शैक्षणिक अस्मिता असलेल्या शाळेला लागलेल्या आगीमुळे शिक्षण प्रेमी मध्ये संताप निर्माण झाला आहे.