पशुधन विकास अधिकारी डॉ सोनटक्के यांचं आवाहन
हिमायतनगर| तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत गोवंश जनावरांचे 100% लसीकरण करण्यात आले आहे. एकूण प्राप्त लस 15200 असून त्यापैकी 15100 लस गोवंशास लावण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी पशुधनाचे लसीकरण घेतले नसतील तर तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ सोनटक्के यांनी केले.
तसेच हिमायतनगर तालुक्यामध्ये सध्या परिस्थितीला एकही लंपी बाधित गोवंश नाही. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, आपल्या गाय-बैल यांच्या अंगावर मोठी पुरळ किंवा गुदी दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन कळवावे. खाजगीत उपचार न करता पशुवैद्यकीय अधिकारी हिमायतनगर डॉ उमेश सोनटक्के, मोबाईल नं 9405002016 किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे. आणि घरपोच उपचार करून घ्यावा असे वाहनही त्यांनी केले. लंपी बाधित जनावर असल्यास तात्काळ कळवावे. खाजगीत उपचार करून घेऊ नये. शासनास कळवणे बांधनकारक आहे. यांची सर्व हिमायतनगर शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असेही ते म्हणाले.