वन व्हिलेज वन ऑफिसर, वेतनत्रुटी, तांत्रिक दर्जा, शैक्षणिक अहर्ता व जुनी पेन्शन आदी महत्वपूर्ण विषयावर संवाद साधणार- राज्याध्यक्ष नितीन धामणे
नांदेड| महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नांदेड शहरातील हॉटेल ताज पाटील येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे करणार असून माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत व खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अश्विनी थोरात, कृषि पदवीधर संघटनेचे महासचिव ऍड. महेश कडूस, जिल्हाध्यक्ष नारायण कदम राज्याध्यक्ष नितीन धामणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच संघटनेचे राज्यसचिव हरिश्चंद्र काळे यांसह राज्यस्तरीय पदाधिकारी हे आयोजित अधिवेशन व चर्चासत्रात वन व्हिलेज वन ऑफिसर, वेतनत्रुटी, तांत्रिक दर्जा, शैक्षणिक अहर्ता व जुनी पेन्शन आदी महत्वपूर्ण विषयावर संवाद साधणार असून संघटनेची ध्येय धोरणे व पुढील वाटचाल याबाबत प्रमुख मार्गदर्शन करतील. सदर बैठकीस राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. असे आवाहन राज्य प्रसिद्धीप्रमुख शिवकुमार देशमुख, संपर्कप्रमुख गुलाब वडजे, जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल आदींनी केले आहे.