नांदेड, अनिल मादसवार| जून्या नांदेडातील भोईगल्ली, ब्रह्मपूरी चौफाळा भागात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री शारदा माता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने नवरात्र दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रामलीला व रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. येथील स्थानिक कलाकारांनी रामायण या मालिकेतील सिताहरण, जटायू रावण युद्ध, अशोक वाटीका विध्वंस, कुंभकर्ण निद्रा भंग, कुंभकर्ण वध व रावण वध हे प्रसंग रामलीलेच्या माध्यमातून सादर केले होते. जून्या नांदेड भागातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनोसक्त आनंद घेतला.
२५ फुट उंचीचा रावण तयार केला होता. कार्यक्रमाची सुरुवात श्री शारदा मातेच्या आरतीने करण्यात आली. आरतीनंतर श्रीं ची भव्य पालीखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री सात वाजता रामायण या मालिकेतील शिर्षक गिताने रामलीलेस सरुवात करण्यात आली. रामलीलेतील सिताहरण व हनुमानाने केलेल्या अशोक वाटिका विध्वंस हा प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने सादर करण्यात आला. या प्रसंगाला प्रेक्षकांनी भरभरुन टाळ्याचा गडगडाट करुन साद दिली. व कौतूकही केले.
रामलीलेमध्ये शंकर घटमाळ यांनी कुंभकर्ण, गणेश रणविरकर – रावण, चंद्रकांत सिंद्धनाथ –बिभीषण, लखन तमखाणे – जामवंत, देवानंद लहाने – श्रीराम, मुकेश लहाने – लक्ष्मण, राहूल खंडागळे – सिता, गणेश गवते –जटायू, निखील रणविरकर – हनुमान, विनोद नेमाडे – अंगद, गोविंद नंदू तमखाणे – हरिण, अक्षय नेमाडे, आकाश तमखाणे , गणेश लोणारे, गोविंद गवते यांनी रावण सेनेतील मुख्य कलाकारांची भूमिका साकारली होती. रामलीलेतील कलाकारांची ड्रेसींग, मेकअप व त्यांच्याकडून सराव करुन घेण्याचे काम बालाजी आडणे, मुंजाजी लहाने, उतत्म खंडागळे यांनी केले.
रावण दहन कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शारदा माता नवरात्र महोत्सव समिती, अध्यक्ष शिवानंद लहाने, उपाध्यक्ष गोविंद तमखाणे, कोषाध्यक्ष संदीप घटमाळ, गोरख तमखाणे, सचिव राजेश गवते, रवि लांडगे, रमेश लोणारे, साई घटमाळ, तानाजी खंडागळे, भोईराज मित्र मंडळ, संस्कृती दही मंडळ, व परिसरातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.
शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी रावण दहन कार्यक्रम होतात परंतू, रामलीला सारखे कार्यक्रम कुठेच होत नाही, म्हणुन या भागातील नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही ही रामलीला गेल्या चार वर्षांपासून यशस्वीरित्या सादर करत आहोत. आणि दरवर्षी आम्ही या रामलीलेमध्ये नवनवीन भाग सादर करत आहोत. यापूढेही करत राहू असे मत समिती अध्यक्ष शिवानंद लहाने, नांदेड यांनी व्यक्त केले.
या रामलीला कार्यक्रमामध्ये आम्ही कोणताही कलाकार बाहेरुन आणत नाही, सर्व स्थानिकचेच असतात, त्यामध्ये बालकलाकार, आणि मुख्य कलाकार आमची कमेटी निवडत असते. सर्वांकडून आम्ही आठ दिवस सरावा करुन घेतो, यामुळे स्थानि कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. आणि ही रामलीला पाहण्यासाठी आता नागरिक खुप मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष, गोविंद तमखाणे यांनी दिली.