नांदेड। कलाल,गौड l,तेलंग समाजाचा उपवर वधू मेळावा संदर्भात महत्वाची बैठक समाजातील मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि जबाबदार सर्वांच्या उपस्थित तीत होणार आहे. याबाबत सर्वांना कळविण्यात येते की, मागील बऱ्याच वर्षांपासून कलाल,गौड,तेलंग समाजाचे मेळावे हे किनवट, माहूर, इस्लापुर, पांढरकवडा व अन्य ठिकाणी घेण्यात आलेले आहेत परंतु नांदेड शहरात गेल्या अनेक वर्षात आपण मेळावा घेण्यासाठी कमी पडलो आहोत.
समाजाचे मेळावे तसेच विविध कार्यक्रम जर शहरात होत राहिले तर समाजाची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि समाचाच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील मंडळींनी आपल्या विचारांची देवाण घेवाण केली तर ती समाजासाठी निश्चितच उपयोगी पडेल.जिल्ह्यातील सर्वच तालुक्याचा जिल्हा हा केद्र बिंदू असतो. जर नांदेड मध्ये उपवर, वधूवर मेळावे आयोजित केले तर जिल्ह्यातील सर्वच समाज बांधवांना सोयीचे होईल.
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या समाजासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनात्मक योग्य प्लॅटफॉर्म नसल्याने समाजाला योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळत नाही. त्यामुळं आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते या हेतूने येत्या काळात समाजाची दिशा ठरवण्यासाठी आपण नांदेड मध्ये भव्य बैठकीचे आयोजण केले आहे. तरी समाजातील सर्व बंधू - भगिनींना आवाहन करण्यात येते की,कलाल ,गौड तेलंग समाजातील राजकीय, सामाजिक, उद्योजक, क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित आणि सर्व समाज बांधवांनी होत असलेल्या बैठकीस उपस्थित राहून मेळावा व इतर समाज उपयोगी कार्यक्रमा बाबत आपल्या सूचना व मार्गदर्शन करावे असे आवाहन राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांनी केले आहे.