आशांनी थकीत मानधन आणि प्रोत्साहन भत्यासाठी केली महापालिकेत दिवाळी साजरी -NNL

रांगोळी काढून,दिवे लावून अतिरिक्त आयुक्ताना दिले निवेदन


नांदेड, अनिल मादसवार।
सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने महापालिकेतील आशांचे थकित मानधन व प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा म्हणून दिनांक १७ ऑक्टोबर रोजी महापौर जयश्री पावडे आणि आयुक्त डॉ.सुनील लहाने यांना निवेदन देऊन विनंती केली होती.

देशातील आणि राज्यातील सर्व आशांना दिवाळीपूर्वी देय मानधन देण्यात आले आहे. परंतु नांदेड महापालिका या वर्षी अपवाद ठरली आहे.आयुक्त डॉ.लहाने हे उपस्थित नसल्यामुळे विलंब झाला असे प्रशासनाच्या  वतीने सांगितले जात आहे परंतु अतिरिक्त आयुक्त किंवा इतर प्रभारीना पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते.तआयुक्तांच्या चुकीच्या नियोजनामुळे आज शहरी आशांची दिवाळी गोड होऊ शकली नाही.


महापालिकेच्या महापौर जयश्री पावडे यांनी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी उपायुक्त यांना आपल्या कक्षात बोलावून शिस्थमंडळा समक्ष दिवाळी पूर्वी अशांच्या मागण्या सोडवाव्यात आणि मकहालिकेतील मयत सफाई कामगार चांदोजी भिवा भिसे यांचे कर्तव्यावर असताना दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी वरिष्ठाच्या त्रासामुळे महाराणा प्रताप पुतळा परिसरात हृदय विकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना काळातील मृत्यू संदर्भाने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी सीटू संघटनेच्या करण्यात आली आहे त्या संदर्भाने वरिष्ठाना अहवाल पाठवावा असे निर्देश दिले होते.

परंतु महापालिकेच्या उदासीनतेमुळे प्रश्न सुटत नसल्याने दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सीटूच्या आशा व इतर कामगारांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेश दारा समोर रांगोळी टाकून दिवे लावले आणि अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांना प्रोत्साहन भत्ता आणि थकीत मानधन देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह इतर मागण्याचे निवेदन दिले. अतिरिक्त आयुक्तानी आपल्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना तात्काळ प्रश्न सोडवावेत असे निर्देश दिले आहेत.

यावेळी संघटनेच्या शिष्ठमंडळात अधक्षा कॉ.उज्वला पडलवार, सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. जयराज गायकवाड,संविता जोधळे, मीना चव्हाण,पूजा जोंधळे, मीनाक्षी कुंठे,दीपाली जोंधळे, वैशाली जोंधळे, जयश्री चौधरी, माया अटकोरे, सारिका आढाव, प्रियंका मगरे,भाग्यश्री तारू, शीतल लोखंडे, शेवन्ता सोनसळे, पुष्पा डोंगरे आदींचा समावेश होता. कॉ. उज्वला पडलवार आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांनी नेतृत्व करीत मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी