हिमायतनगर| पुर्वीच्या काळात दिवा, बत्ती, कंदीलच्या साह्याने उजेड करूण अंधार दूर करण्यात यायचा, कालांतराने तंत्रज्ञान विकसित झाल्याने विजेचा वापर सर्वत्र केला जात आहे. विज आता सर्व स्तरात महत्वपूर्ण गरज बनली आहे. विज ग्राहकांना वेळेवर व सुरळीत विज पुरवठा करण्यासाठी आमची टिम कटिबद्ध आहे. ग्राहकांनीही आपल्या कडील विजेचा भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करावे. असे अवाहन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे लहाणकर यांनी केले.
पुढे बोलतांना श्री लोणे म्हणाले की, माझ्यासह आमचे सर्व अधिकारी कर्मचारी कार्यालयांच्या माध्यमातून सातत्यानं कर्तव्य तत्परतेने काम करीत आहोत. कार्यालयाचे सर्व लाईनमन कर्मचारी ही सतत जबाबदारीने काम करीत आहेत. बहुतांश ठिकाणी विज ट्रांस्फर खराब झाले, नादुरुस्त आहेत. ते दुरूस्तीचे काम वेगाने पूर्ण करीत आहोत. विज ग्राहकांनी आपली जिम्मेदारी पार पाडण्यासाठी पुढे यावे. घरगुती वापराचे विज मिटर वापरात असलेल्या ग्राहकांनी आपल्याकडील विजेचा भरणा वेळेवर करूण विज वितरण कंपनीस सहकार्य करावे. असे अवाहन ही उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे लहाणकर यांनी केले आहे.