हिमायतनगर| शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या माता कालिंका मंदिरात नवरात्री निमित्ताने दररोज हजारो भाविकांची दर्शन आणि महाप्रसादासाठी गर्दी होते आहे. कालिंका देवी समितीच्या वतीने या सर्व भाविकांची स्वयंसेवक मंडळीं निस्वार्थ भावनेने सेवा करत असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव दि.२६ पासून सुरुवात झाली असून, मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने पहिल्या दिवशी अलंकार सोहळा आणि घटस्थापना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे. त्या दिवशीपासून मंदिरात विविध धार्मिक सामाजिक, स्पर्धात्मक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने संपन्न होत आहेत. दर्शनासाठी येणारया भाविक भक्तांना दररोज सायंकाळी ७ वाजताची महाआरती झाल्यानंतर भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याकामी स्वयंसेवक युवक व महिला मंडळी मोठ्या भक्ती भावाने भाविकांची सेवा करत आहेत.
नवरात्रीच्या ९ दिवस दर्राओज वेगवेगळा मेनू असलेला जेवण २ ते ३ हजार भाविकां दिले जात आहे. हे सर्व युवक मंडळी, व गावकऱ्यांच्या सहकार्यातून होते असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे शांततेत दर्शन, भोजन आणि गरबा दांडियाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी मातेच्या दर्शनसाठी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कालींका देवी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदीनवार, दिलीप पारडीकर, संजय मारावार, गजानन तीप्पनवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, नारायण गुंडेवार, रामकृष्ण मादसवार, शरद चायल, योगेश चिल्कावार, विनोद गुंडेवार, राजू जैसवाल, गजानन चायल, विष्णू रामदीनवार, मनोज मादसवार आदींसह मंदिर कमिटीच्या सर्व सदस्य व स्वयंसेवक महिला पुरुष मंडळींनी केले आहे.