नांदेड| जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी अधिसूचना काढलेला २५ टक्के पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. आधी सूचना निघून एक महिना होत आले असताना पीकविमा वर्ग झाला नसल्याने पिकविम्याची रक्कम खात्यात टाकण्यात यावे अशी मागणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांची भेट घेऊन बालाजी ढोसणे यांनी निवेदन देऊन केली आहे.
जर शासन नियमाचे पिक विमा कंपनी उल्लंघन करत असेल तर त्या कंपनीवर शासन नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्हा भरांमध्ये सलगच्या पूर्व सूचना ह्या 25% पेक्षा जास्तीचे असल्यामुळे शासन नियमानुसार अनुसरून संयुक्त समितीचे पंचनामे व्हावेत आणि पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून शेतकर्यांची होणारी लूट थांबवावी .अशी आग्रही मागणी बालाजी पाटील ढोसणे यांनी आज भेटून केली.
जर ही मागणी मान्य नाही झाली तर दिनांक 20 तारखेपासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ढोसणे यांनी दिला. यावेळी साहेबांच्या बोलण्यावरून 25% पीक विमा साठी कंपनीने ऑब्जेक्शन घेतल्याचे जाणवत होते.त्यामुळे शेतकरी बांधवानो सावध रहा राञ वैर्याची आहे.यावेळी शहरप्रमुख शंकर चिंतमवाड,युवा सेनेचे बालाजी पाटील ढोसणे,गोविंद पाटील वसुरकर ऊपस्थितीत होते. नोट:सर्व शेतकर्यांनी पिक विमा कंपनीकडे पिक नुकसान झाल्याची तक्रार करावी.