अंगणवाडीचा माल काळ्या बाजारात नेत असताना गावकऱ्यांनी टेम्पो रंगेहात पकडला -NNL


शिवणी, प्रकाश कार्लेवाड| किनवट तालुक्यातील मौजे चिखली ( ई ) येथील अंगणवाडी सेविकेने दि.१० ऑक्टोबर रोजी सनदा माता व ० ते ३ वयोगटातील बालकांना वाटप करायचा खाऊ आणि पोषण आहार भरदिवसा टेम्पोमध्ये भरून विक्री करण्यासाठी नेत असताना गावकऱ्यांनी टेम्पोचा पाठलाग करून सदरील टेम्पो मध्ये असलेला मुद्देमाल व अंगणवाडी सेविकेस शिवणी येथे  रंगेहात पकडून संबधित विभागाच्या वरिष्ठांना माहिती चिखली येथील गावकऱ्यांनी कळविले.  

अप्पारावपेठ अंतर्गत येणाऱ्या पोषण आहारच्या पर्यवेक्षिका यु. के. कंठेवाड यांनी सदरील घटनास्थली येऊन चोरीने टेम्पो मध्ये नेत असलेल्या सर्व पोषण आहाराची पडताळणी करून पंचनामा करून इस्लापूर येथील संबधित विभागाच्या ठिकाणी हा माल ठेवण्यात आला. यावेळी सदरील टेम्पो धरण्यासाठी आलेल्या गावाकऱ्यांनी चिखली ( ई ) येथील अंगणवाडी सेविकेस बडतर्फ करावे अशा प्रकारचे लेखी निवेदन गावाकऱ्यांनी दिले.
       

तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम भागातील किनवट तालुक्यातील चिखली (ई ) येथील अंगणवाडी सेविकेने दि. १०/१०/२०२२  रोजी दुपारच्या वेळी गावात कोणी नसल्याचे बघून आपल्या माहेरचा टेम्पो बोलावून घेऊन त्यात अंगणवाडी मार्फत वाटप होणारा पोषण आहार परस्पर विक्री करण्यासाठी एम.एच.२६ एडी ६८११ मध्ये गहू, तांदूळ, मिरची पावडर, साखर, हळद, तेल, मुगाची दाळ, बेबी केयर किट यासह इतर अनेक वस्तू मोठया प्रमाणात गाडीत भरून शिवणी मार्गे इस्लापूर दिशेने जात असताना चिखली (इ) गावातील काही तरुणांनी सदरील टेंम्पोचा पाठलाग करीत शिवणी येथील बस स्टँड येथे रंगेहात पकडण्यात आला. तेव्हा अंगणवाडी सेविकेने चिखली ( ई ) येथील तरुणांशी हुल्लड बाजी करत अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली व हा पकडलेला टेम्पो तात्काळ सोडा अन्यथा तुमच्यावर विविध आरोप लावून तुमच्यावर गुन्हे दाखल करते अशी भीती दाखवली.

तेव्हा बस स्टॅन्ड परिसरातील असलेले काही प्रवासी व गावकरी जमा झाले असता, सदरील प्रकरण हे पोषण आहाराचे अफरातफरी करत असलेले उघडीस आले. टेम्पो धरलेल्या तरुणांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले फोनद्वारे याची दखल घेत अप्पारावपेठ अंतर्गत येणाऱ्या पोषण आहार पर्यवेक्षिका यु. के. कंठेवाड यांनी सदरील टेम्पो मध्ये असलेला आहारची चाच पडताळणी करून पंचनामा करत सदरिल टेंम्पो इस्लापूर येथे नेऊन तेथील अंगणवाडी मध्ये जमा करून संबंधित अंगणवाडी सेविकावर कार्यवाही करू असे यु.के. कंठेवाड यांनी गावकऱ्यांना विश्वास दिले.

तर दुसऱ्या दिवशी हे सर्व पोषण आहार किनवट येथील बाल विकास प्रकल्प च्या अधिकारी अश्विनी ठक्करोड यांच्या समक्ष हा माल जमा करण्यात आले. किनवट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गरोदर महिला व  बालकांना पोषण आहार वाटप करण्यासाठी विविध प्रकारचे धान्य व पोषण आहार येत असतो या साठी लाखो करोडो रुपये शासन स्थरावर खर्च होतात पण मागील अनेक वर्षांपासून सदरील अंगणवाडी सेविका वाटप न करता अनेक वेळा अफरातफरी करत असताना आढळून आल्याचे चिखली (ई )येथील महिला वर्गाने बोलताना सांगितले.

हा माल अफरातफरी करणाऱ्या चिखली (ई )  येथील सेविकेला बडतर्फ करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली करिता वरिष्ठांनी या विषयाकडे लक्ष केंद्रित करून सदरील अंगणवाडी सेविका मार्फत वाटप होणाऱ्या  पोषण आहाराची चौकशी करून सदरील अंगणवाडी सेविका वर कारवाई करावी अशी चिखली (ई )  गावाकऱ्याकडून मागणी केली असून या प्रकरणी सदरील अंगणवाडी जात असून अंगणवाडी सेविकेवर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाई करतील या कडे गावकऱ्यांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे. 

लाभार्त्यांना वंचित ठेवून सदरील पोषण आहार परस्पर अफरातफरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला टेम्पोत असलेल्या मुद्दे मालासह पकडणारे चिखली (ई ) येथील ग्रामपंचायत सदस्य अजय वाघमारे, दिनेश वाघमारे, जगदीश वाघमारे, गंगाधर झरिवाड, नितीन वाघमारे, अंजना नागेश गटुवाड , अंजना लक्ष्मन खुपसे, बालाजी खरोडे, बाबू पांडुरंग आंबटवार, प्रवीण व्यंकटेश झरीवाड,यांनी पाठलाग करत टेम्पोला पकडल्याने चिखली येथील गावकऱ्याकडुन सर्व तरुणांचे कौतुक केले जात आहे.           

दि.१० ऑक्टोबर रोजी  दुपारी चिखली (इ) येथील अंगणवाडी सेविकेने प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पोषण आहाराचा माल परस्पर अफरातफरी करत असताना गावीतील काही तरुणांनी मुद्देमाल सह टेम्पो पकडला असे फोनद्वारे माहिती कळाल्याने मी तात्काळ त्या कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पर्यवेक्षिका यांना घटना स्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.सदरील अहवाल माझ्याकडे आले असून.असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून घडत आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.करीता संबधित अंगणवाडी सेविकेला मागील अनेक महिन्याच्या पासून पुरवठा होत असलेल्या पोषण आहाराचे चौकशी करण्यासाठी विविध विभागातील व आमच्या विभाच्या एकूण पाच सदस्यांची समिती गठन करून संपूर्ण चौकशी करण्यात येईल चौकशीचा अहवाल येताच संबंधितावर पुढील करवाई करू. .अशी माहिती आश्विनी ठक्करोड बाल विकास प्रकल्प अधिकारी किनवट.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी