उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे दहिकळंबा ता.कंधार येथील ग्रामपंचायतवर बिनविरोध सरपंच व उपसरपंच म्हणून एकाच कुटुंबातील सुशिक्षित असलेल्या पती - पत्नीचे राजयोग घडून आला आहे.
कंधार तालुक्यातील मौजे दहिकळंबा येथील ग्रामपंचायतची निवडणूक ही फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडल्या होत्या. दहीकळंबा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ असून ,या नऊ जागेसाठी निवडणूक लढवण्या साठी वैरागी महाराज ग्राम विकास पॅनल व अन्य एका ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल आमने-सामने उभे राहून ग्रा.पं.निवडणूकीत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.या निवडणुकीकडे मोठ मोठ्या नेत्यांचे लक्ष लागले होते. वैरागी महाराज ग्राम विकास पॅनल या पॅनलला प्रचंड बहुमत मिळाले होते. सरपंच म्हणून कमलबाई मारोतराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
त्यांच्या अकाली निधनानंतर काही महीन्यापूर्वी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्या. दिवंगत कमलबाई शिंदे यांच्या सुनबाई सौ. जोतीताई शिंदे यांनी आपली उमेदवारी दाखल करत मोठया मताधिक्याने पोटनिवडणुकीत मोठा विजय प्राप्त केला.व सरपंच पदाच्या दावेदार बनल्या. दि.11 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय दहिकळंबा येथे मासिक बैठकीचे आयोजन करून सर्व 9पैकी 9सदस्य उपस्थित राहून सौ. जोतीताई अवधूत पाटील शिंदे यांना बिनविरोध सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवले. तर त्यांचेच पती अवधूत शिंदे यांची उपसरपंच पदी स्पष्ट बहुमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.
दहीकळंबा येथील तरूण तडफदार युवा कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे , आणि तसेच जिल्ह्यातील व कंधार तालुक्यातील जेष्ठ नेते मा. सभापती कै.माधवराव पांडागळे यांच्या तालमीतील खेळाडू अवधूत मारोतराव पाटील शिंदे हे ( बी.ए.) पदवीधर आहेत.तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून गावची काम करायला सुरुवात करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ.ज्योतीताई अवधूत पाटील शिंदे ,या सुध्दा बारावी उत्तीर्ण आहेत. या कुटुंबातील सुशिक्षित असलेल्या परिवारास सरपंच , उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याने राजयोग घडून आला आहे.
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी महाजन सी. एन मंडळ अधिकारी फुलवळ हे होते तर ग्रामविकास अधिकारी जी. डी. टोकले,किशनराव पां. शिंदे, दिगंबर पा. शिंदे, सौ.ताराबाई शिंदे , पार्वतीबाई शिंदे,वंदनाबाई पुटेवार, कोंडाबाई गणगोपाळ, शिवनंदाबाई वाघमारे व गावकरी उपस्थित होते . निवडणूक अधिकारी यांनी विजयी उमेदवाराचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.व फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.