15 व्या उपवधू-वर परिचय मेळाव्याचे माहितीपत्रक आणि नाव नोंदणी फॉर्मचे प्रकाशन -NNL


नांदेड ।
जिल्हा भावसार समाजाचे विश्वस्त श्री दिगंबरराव बुलबुले, श्री लक्ष्मीकांतजी माळवतकर, अध्यक्ष श्री गंगाधरराव बडवणे, सचिव श्री सुरेश गोजे, कार्यअध्यक्ष गिरीष बुलबुले.अध्यक्ष सोमनाथ भागानगरे , भावसार सेवा संघ, सौ विणाताई माळवतकर, अध्यक्ष भावसार प्रगती महिला मंडळ. आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

याप्रसंगी सचिव श्री सुरेश गोजे यांनी 15 वा उपवधू-वर परिचय मेळावा 25 डिसेंबर 2022, रविवार रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार असल्याचे सांगितले. मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व समिती प्रमुखांना कामाचे स्वरूप व कामे वाटप करण्यात आली. याप्रसंगी श्री प्रा.घन:श्याम येळणे, डॉ.विजय काटकाडे, श्री मनोज सवणे यांचे समयोचित भाषणे झाली. नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारिणीच्या वतीने सर्व समाज बांधवांना तन-मन- धनाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास सितावार, संजय गुंडाळे, प्रविण गंडरघोळ, राजेश सूत्रावे, शिवराज पेंडकर यांनी विशेष मेहनत घेतली. 


या कार्यक्रमास भावसार समाज कार्यकारणीतील मुरलीधर गोजे, विनोद सूत्रावे, प्रकाश उखळे. संजय बुलबुले माणिकराव देवतराज, वसंत कंकाळ, अशोक सितावार, मधुकर फटाले, प्रभाकर पेटकर, चंद्रकांत बडवणे, श्रीनिवास बुलबुले, कल्पनाताई पूरनाळे तसेच प्रगती महिला मंडळातील अनु मेहेत्रे, सुनिता सुत्रावे, छाया माळवतकर, जयश्री माळवतकर, गायत्री बडवणे, अर्चना वळसे, संगीता फटाले, संगिता बुलबुले, प्रतिभा अपसिंगेकर, मुक्ता पेटकर, भावसार युवा कार्यकारिणीचे दत्तराज फटाले, विशाल हिरास, महेश टने, कमलकिशोर  महात्मे आणि भावसार सेवा संघातील गजेंद्र गुंडाळे, रमाकांत लोखंडे, गिरीष केदार, विनोद बडवणे आणि  समाजातील प्रतिष्ठित नागरीक  आणि महिला उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी