भोकर। दहा ऑक्टोबर राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळला जातो. मुलांमध्ये जंतांच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण, रक्तक्षय परिणामी शारीरिक मानासिक वाढ खुंटणे असे आजार जडतात.व य वर्ष एक ते १९ वयोगटातील मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंत नाशक गोळ्या मोफत दिल्या जात आहेत.
राष्ट्रीय जंत नाशक दिनी म्हणजे दि १० रोजी तसेच उर्वरीतांना दि. १५रोजी देण्याची मोहिम आरोग्य विभागाने घेतली आहे. भोकर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत आज १६४ मुलांना जंत नाशक गोळया खाऊ घालण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक,
पांडुरंग तमलवाड आरोग्य कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना जंतापासून संरक्षण कसे करावे व जंत नाशक गोळयांचे फायदे सांगत मार्गदर्शन केले आहेत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री नरसिंग पसनुरवार सर,सहशिक्षक श्री मिलिंद जाधव, विलास गायकवाड, रमेश खांडरे, कांचन जोशी, मोहिनी बाचेवाड आदी उपस्थित होते. तालुका वैद्यकिय अधिकारी यांचे पथकही विविध शाळा व अंगणवाडी येथे भेटी देऊन मोहिमेचा आढावा घेतला.