नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड .आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी ता. जिल्हा नांदेड याच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव राष्ट्रचेतना 2022 अंतर्गत महाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
यामध्ये महाविद्यालयातून सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता बोंढारे मॅडम तसेच सांस्कृतिक सहाय्यक विभाग प्रमुख म्हणून आशिष दिवडे सर या ही सर्व विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेमध्ये सादरीकरण करत आहेत. वामन दादा करंडक रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा सादर करण्यात आला .
यामध्ये निलेश चटने,अविनाश कोकुर्ले, श्रद्धा राका, सृष्टी चव्हाण, वैष्णवी कंठाळे , रोशनी पाईकराव ही सर्व विद्यार्थी सहभागी होते . तर शेख सदाफ मारिया या विद्यार्थिनींनी वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. तिने भारताचे 75 वर्षात काय कमावले व काय गमावले या विषयावरती इंग्लिश मध्ये ..डॉ ए. .पी. जे . कलाम या रंगमंचावर सादरीकरण केले.
पोवाडा आणि सर्व कार्यक्रमासाठी वादक म्हणून शाहीर वामनदादा करंडक मंच ही टीम सोबत होती . त्याचबरोबर महाविद्यालयातील आदरणीय प्राचार्य .डॉ. उज्वला सदावर्त मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या . त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. संचालक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख .डॉ. सूर्यप्रकाश जाधव सर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . त्याचप्रमाणे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.