नांदेड, गोविंद मुंडकर। वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी अर्थात नीट उत्तीर्ण होऊन बराच कालावधी झाला. निर्धारित कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे.असे असताना तब्बल तीन दिवसापासून साईट बंद असल्याचे सांगण्यात आले. काही काळ सुरू असल्यास त्यावेळी अगदीच संथगती सुरू आहे.
वीस मिनिटात एक फॉर्म पूर्ण होणे शक्य असताना तब्बल अडीच ते तीन तास एक फॉर्म नोंदणीसाठी लागतो आहे. निर्धारित कालावधीत फॉर्म भरण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना रात्र- रात्र जागून सुद्धा एक फॉर्म पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे फॉर्म रजिस्ट्रेशन अथवा अर्थात नोंदणीसाठी ओटीपी घ्यावी लागते त्यासाठी एसएमएस विद्यार्थ्यांना येत नव्हते अधिक माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की, यासाठी सीईटी सेलने रक्कम भरली नव्हती त्यामुळे एसएमएस येणे ठप्प झाले होते.
यावरून भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे. दरम्यान पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्तच नव्हे तर संतप्तही झाले आहेत. मोठ्याने सायासाने आता एसएमएस प्रक्रिया सुरू झाली. असली तरी फॉर्म भरण्यासाठी साईड गतीने चालत नसल्यामुळे आणि निर्धारित वेळेत फॉर्म भरण्यासाठी कौन्सलर आणि नेट कॅफे यांच्याकडे प्रचंड गर्दी असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त दिसून येत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी काही पालकांनी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.