नविन नांदेड| दसरा मेळावा शिवतीर्था वर होणार असल्याचे न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर झाल्यानंतर सिडको शिवसेनेचा वतीने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फटाक्यांच्यी आतीषबाजी व पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला,व जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्या.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दसरा मेळावा शिवतीर्था वर होणार असल्याचे २३ सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जल्लोष साजरा केला, सिडको हडको शिवसेनेचा वतीने जेष्ठ शिवसैनिक व्यंकोबा येडे, माजी तालुकाप्रमुख अशोक मोरे, माजी नगरसेवक शाम जाधव, माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड,निवृत्ती जिंकलवाड, जितुसिंग टाक,दिपक देशपांडे, ब्रिजलाल उगवे, कृष्णा पांचाळ, पप्पु गायकवाड, विष्णू कदम, सतिश खैरे, अतुल धानोरकर,संदीप जिल्हेवाड, संदीप कुमार साबणे, यांच्या सह पदाधिकारी यांनी सायंकाळी सहा वाजता सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जवळ फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जल्लोष करून मिठाई वाटप केली.
यावेळी ऊपसिथीत पदाधिकारी व शिवसैनिक यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजय असो,जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्या. यावेळी जेष्ठ पदाधिकारी ब्रिजलाल उगवे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले,तर जितु सिंग टाक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.