मागील तीन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेती, शेतातील पिक, घर, शेत अवजारे, पाळीव जनावरे असे मोठे नुकसान झालेले आहे.
मागील ऑगस्ट महिन्यात २० ते पंचवीस दिवस पाऊस न पडल्याने जवळपास ३० ते ४० टक्के उत्पादन घाटलेले आहे. त्यामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्यातच अतिवृष्टीने कहर केलेला आहे. पिक पाण्यात आहेत काही ठिकाणी बंधारे फुटून शेत वाहून गेलेले आहेत, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, हे पिक पिवळे पडलेली आहेत, कापूस लाल होवून सुकायला लागला आहे, ज्वारी, बाजरी, उडीद काढणीला आलेले जाग्यावर उगवायला लागले आहे, भाजीपाला,, खराब झालेला आहे. सध्या सर्व शेती नुकसानीत आहे.
शासनाकडून वारंवार ई - पिक पाहणी ॲपवर नोंदणी करण्याचे सांगत आहेत पण हे ॲप चालत नाही. नोंद करायची वेळ ७२ तासाची दिलेली आहे. पण हे ॲप मागील चार दिवसापासून चालत नाही. फोन लागत नाही फोन बंद येतो कशी नोंदणी करायची हा प्रश्न आहे. बरं ही नोंदणी केली त्यानंतर शासकीय यंत्रणा किंवा विमा कंपनीचे कर्मचारी आणि पंचनामा टीम शेतात पंचनामा करण्यासाठी आली खरी पण ते कुठे वास्तव प्लांट वर न जाता गावातील एका कोपऱ्यात फक्त शेतकऱ्यांचे फोटो काढते आहे .खरचं तेवढे नुकसान झाले तेवढे काही त्यांना दिसत नाही ते येणारे प्रतिनीधी पैसे मागणी करत आहेत.
आमचे नुकसान झाले पिक विमा आम्ही भरला आणि नुकसान होवून सुध्दा आमच्या कडून पैसे घेतले जाते किती अन्याय आहे शेतकऱ्यांवर ई - पिक पाहणी ॲपवर फोटो व माहिती अपलोड केल्यास त्याची संकलित माहिती पाहण्यासाठी तेवढे आहे का? या सर्वांचे उत्तर नाही असेच येणार. मग उगाचच आम्हा शेतकऱ्यांना वेड्यात का काढता, त्रास का देता? सरसकट मंडळानुसार झालेला पाऊस नोंदी घेवून नुकसान भरपाई द्यावी. किंवा तुमच पाणी मिली मापक बसवा कृपया नोंदणी, तक्रारी, ऑनलाईन, अँगल कॅम फोटो यात वेळ आमचा घालवू नका , आम्ही शेतात फवारणी करावी कि ड्रेचींग करावी कि... आमचे काम सोडून हेच करायचे का...?
खरच सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का व किती शेतकऱ्यांना मोबाईलवर हे करता येते व सर्व च गावात ताड्यात वाडीत आणि खेड्यात साहेब नेटवर्क आहे एकदा आमच्या खेड्यात येवून पाहावे तेव्हा कळले आणि शेतकरी स्वःताच्या परेशानी मध्ये असते खरच वेळ मिळेल का सांगावे खरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट आहे आणि परेशानी मात्र खूप आहे तुम्हीच सांगा पिक विमा भरणे म्हणजे गुन्हा आहे का.??
....एक शेतकरी, कल्याण वानखेडे, पळसपूरकर, ता.हिमायतनगर