हदगाव शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी माजी खासदार यांना रस्त्यावर उतराव लागलं -NNL

शांताता कमेटीत केलेल्या सुचनांना 'खो'


हदगाव, शे चादपाशा|
हदगाव शहरात धावणारे वाहन व ऐन पावसाळ्यात मुख्यनालीचे काम व यात आणखीन भर म्हणून रोडचे संथगतीने काम व गणपती उत्सवाच्या निमित्तानं पोलिस अधिक्षकांच्या उपस्थित शहरातील नागरिक व पञकारांनी केलेल्या सुचनांना प्रशासनाने 'खो ' दिल्याचे दिसुन येत आहे.

हदगाव शहरातील मुख्य रोड तामसा टी पाईट (बाबासाहेब आबेडकर चौक) च्या परिसरात बुधवारी माजी खा सुभाष वानखेडे हे जिल्ह्याच्या ठिकाणी पक्षाच्या महत्वाच्या बैठकी करिता जात असताना त्यांना नेहमी प्रमाणे ट्राफीक जाम होती. एका आटोत बिमार असलेला व्यक्ती त्यांच्या नजरेस पडला अन्  ते आपल्या वाहनातुन खाली उतरले. त्यांनी नेहमी प्रमाणे विस्कळीत होत असलेली ट्राफिक जाम सुरळीत केले. पण तिथे पोलिस स्टेशनचा कोणी पोलिस नेहमी प्रमाणे दिसुन आलेल नाही. हे पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने भुषणवाह नाही. अश्या ठिकाणी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी किमान ऐखाद्या तरी पोलिसांची नियुक्ती करावी अशी नागरिकाची मागणी होत आहे.


वाहनधारक बेफाम ...

सध्या शहरात गणेश उत्सवाची धुम आहे शहरात काही टुकार वाहनधारक टुव्हिलर बे-बाम ट्रिपल सीट कर्णकर्कश आवाज तसेच बिना नंबरचे प्लेटच्या टूव्हिलर तर काही इ.राज्याच्य वाहने दिसुन येतात. शहरातील मुख्य रोडावर यांचा हैदोस दिसुन येत आहे. माञ स्थानिय पोलिस माञ ठोस आशी कारवाई कलाताना दिसुन येत नाही. थातुर मातुर कारवाईचा देखावा करण्यात येत आहे. आणखीन विशेष म्हणजे हे टवाळखोर युवकाच्या दुचाकी सकाळी शाळेच्या व महाविद्यालच्या वेळेत हे टूव्हिलरच वेडे असणारे रिकामटेकडे फँन्सी सायलेन्सर व हार्णमुळे शाळा महाविद्यालये जाणा-या मुला रोडवरुन चलणे धोक्याचे झालेले आहे.

केलेल्या सुचनांची दखल नाही ...

गणेश उत्सवच्या पार्श्वभूमीवर नादेड जिल्याचे पोलिस आधिक्षक यांनी २९ आँगष्टला हदगाव शहरात शातांता बैठक घेतली होती. त्या बैठकीत नागरिक सामाजिक कार्यकर्ते व काही पञकारानी सुचना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने शहरात मुख्य प्रवेश रोडवर काही व्यापा-यानी टेकडे केले. यामुळे वाहन धारकाना खुप ञास होत आहे. इतकेच नव्हे जड टुव्हिलर कार वाहने आटो कुठं ही उभे करण्यात येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नेहमी असते. यामुळे केव्हाही शांताता भंग होण्याचा नेहमी धोका असतो. याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे शांताता बैठक तरी कश्याला घेता अशी चर्चा ऐकवायास मिळत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी