केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन -NNL


मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचा सन्मान करण्यात आला. 

केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला. मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री.राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री  अमित शहा यांना गणेश मूर्ती भेट दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार पूनम महाजन, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर  बावनकुळे, आमदार ॲड. आशिष  शेलार, माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवास भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. दरवर्षी विविध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या या मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड.आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार ॲड. आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे २७ वे वर्ष असून, या मंडळामार्फत दरवर्षी एका प्रसिद्ध मंदिराची आरास केली जाते. मागील वर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते. तर, मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गणेशोत्सव मंडळामार्फत धार्मिक उत्सवाबरोबरच अनेक वैद्यकीय तसेच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येत असून आरोग्याबाबतचे आवश्यक ते सर्व नियमही पाळले जात असल्याची माहिती, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी