नवीन नांदेड| नवीन नांदेड कौठा परिसरातील कच्छवेज् गुरुकुल स्कूल म्हाडा नांदेड येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती (ता. पाच ) शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
सकाळी नऊ वाजता शाळा सुरु झाल्यानंतर इयत्ता दहावी तील विध्यार्थीनी पाहिली पासून आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविले.यात मुख्याध्यापक म्हणून कु. शिवलीला नरंगले या विद्यार्थिनीने भूमिका बजावली. तर शिक्षक म्हणून ऋतुजा सोगे, अर्पिता गजभारे,श्रीनिधी तिवारी, कविता गणदलवाड, साक्षी पाल, साक्षी बोरगुल्ला,सतीश धुमाळ श्रीकांत पुरी,शुभम वैद्य, अमित राठोड,गौरव गजभारे, हर्ष पेन्शनवर व रोहित पुयड या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका बजावल्या. नंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पालक श्री बालाजी नरंगले यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी शिक्षकांचा व शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दुर्गादेवी कच्छवे ह्या होत्या यावेळी उपमुख्याध्यापक श्री सचिन वसरणीकर, प्रशांत बारादे, श्री सिसोदिया आबासाहेब, शिल्पा कत्तेवार, शीला अनंतवार,उषा किनकर, भाग्यश्री तेहरा, सीमा मुरकुटे, सुनीता सावते यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.