अन्यथा जनहित याचिका दाखल करणार - गौतम जैन यांचा इशारा
नांदेड, अनिल मादसवार| कोरोना निर्बंधामुळे दोन वर्षे साधेपणाने गणपती बाप्पाचा उत्सव साजरा झाला. यंदा शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशाचे विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी मंडळांना द्यावी. आणि प्रशासनाने मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी केली आहे. अन्यथा न्यालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अंगितले आहे.
नांदेड शहराचे पोलीस प्रशासन गणेश मंडळांना ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी नाकारात आहे. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गणेश मंडल पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धाक दाखवत उत्सवावर एक प्रकारे बंधन लादण्याचा प्रयत्न करत आहेत. ध्वनीप्रदूषण नियंत्रण व नियमन अधिनियम २००० नुसार डिजेसाठी डेसिबल मर्यादा ठरवून दिलेली आहे. दिवसा औद्योगिक परिसरासाठी ७५ डिसेबिल, व्यवसायिक परिसरासाठी ६५, रहिवासी परिसरासाठी ५५ व शांत परिसरासाठी ५० डेसिबल, रात्रीच्या वेळी औद्योगिक परिसरासाठी ७० डेसिबल, व्यवसायिक परिसरासाठी ५५, रहिवासी परिसरासाठी ४५ व शांत परिसरासाठी ४० डेसिबल मर्यादा घालन दिली होती. असे असताना डिजे वाजविण्यासाठी परवानगी का दिली जात नाही असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
शहरातील खड्डे बुजवा, विसर्जन मिरवणूक मार्गीवरील अतिक्रमण हटवा, शेवटच्या गणेशाचे विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करून परवानगी द्यावी. गणेश विसर्जनं मिरवणूक मध्ये ध्वनिवर्धक व घ्वनिभपक ४ बाय ४ चे ४ बॉक्स, १ बाय ४ चे ४ बॉक्स, इम्प्लिफायर, लैपटॉप, ८ एल.इ.डी, ८ फोकस एल.ई.डी, जनरेटर, ट्रैकटर राहणार आहे. याची परवानगी पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळास द्यायला हवी. अशी विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. एकूणच नांदेड पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी व गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक मध्ये ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी द्यावी असेही जिल्हाधिकारी नांदेड याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनाच्या प्रति त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड, पोलीस निरीक्षक, वजीराबाद नांदेड याना दिले आहे. या निवेदनावर श्री यादव युवक गणेश मंडळ, हनुमान पेठ वजीराबाद नांदेडचे अध्यक्ष, गौतम नर्सिंगदास हिरावत, वीरशैव गणेश मंडळ अध्यक्ष महेश देबडवार, राष्ट्रीय गणेश मंडळ शिवशक्ती नगर, मिल गेट एरिया नांदेडचे अध्यक्ष, रोहित नळ, राष्ट्रीय गणेश मंडळ अध्यक्ष राहुल भूसेवाड, बाळ गोपाळ गणेश मंडळ अध्यक्ष सचिन माने, नांदेड युवक गणेश मंडळ, राजस्थानी गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, गौरी गणेश मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, सचिन पाटील, विजय यादव, बबलू यादव, मनोज यादव, अंकुर पटेल, राज यादव, आदींची उपस्थिती होती.