लंम्पी रोगाचा शिरकाव थांबविण्यासाठी हिमायतनगरचा पशुसंवर्धन विभाग झाला सज्ज -NNL

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदामुळे येताहेत अडचणी 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
मराठवाड्याच्या सीमेवरील तेलंगणा राज्यात लंम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जनावरांना होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पशुसंवर्धन विभागाची जागरूकता मोहीम सुरु झाली आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी गावकर्यांनी सहकार्य करून आपल्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी आणि फवारणी करून घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी यु.बी. सोनटक्के यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव हिमायतनगर शहरासह परिसरात होवू नये यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, प्रत्येक गाव खेड्याच्या सर्कलमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जनावरे बांधली जाणाऱ्या गोठ्यात माश्या-गोमाशे होणार नाही. यासाठी या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन गोठे स्वच्छ करुन घेण्याचे संगीतळे जात आहे. तर ठिकठिकाणी फवारणी या रोगापासून जनावरांना दूर ठेवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. आत्तापर्यंत हिमायतनगर तालुक्यातील खडकी, कामारी, टेंभी, वाशी आदी गावात जावून गोठा स्वच्छता करणे याबाबतची माहिती शेतकऱ्यांना व्हावी म्हणून गोठा फवारणीचा डेमो दाखविले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.


लंम्पी रोग हा त्वचेचा रोग असून गोट पाॅक्स विषाणू मूळे याचा प्रसार होतो. त्याची लक्षणे गाय, म्हैस या जनावरांना ताप येणे, शरीरावर गाठी येणे, गाभण जनावरांचा गर्भपात होणे, लंम्पी रोगाची आदी प्रकारे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसून येताच पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ माहिती द्यावी. यासाठी करंजी तेल 5ml नीमतेल 5 ml प्रत्येकी एक लिटर पाण्यात मिसळून अंगाचा साबनाचा फेस केलेली पाणी हे समप्रमाण द्रवणात तयार करून गोठ्यात फवारावे असे डॉक्टर यु.बी. सोनटक्के यांनी सांगितले. तसेच गोट पाॅक्स विषाणू लम्पीरोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु केली जाणार असून, नांदेडहून गोट पाॅक्स लसीचे वाटप होताच लसीकरण मोहिम राबविली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे, मात्र कर्मचारी सांख्य कमी असल्यामुळे शिबीर राबविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ असून, येथे परिचर दोन आणि पट्टिबंधक एक अशी तीन पदे रिक्त आहेत. तसेच तालुक्यातील मंगरूळ येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ असून,येथे पशुधन पर्यवेक्षक एकच कर्मचारी असून, दवाखाना मोडकळीस आलेला आहे. सरसम बु.येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ असून, या दवाखान्या अंतर्गत २२ गवे येतात. मात्र येथील पशुधन पर्यवेक्षक यांचे पद रिक्त असल्यामुळे सादर दवाखांचे कामकाजास अडथळा येत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे तात्काळ भरून  पशुधनाच्या बाबतीत येणाऱ्या विविध रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे मत उपचारासाठी अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी