सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी ऊपसिथीती
नविन नांदेड। भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष युवा शक्ती मित्र मंडळ हडको यांच्या वतीने आयोजित दहिहंडी नांदेड येथील जय बजरंग मंडळांनी फोडुन ५१ हजारांचे पारितोषिक पटकावले यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मान्यवरांच्यी उपस्थितीती होती,या सोहळ्याला महिला व पुरुष व युवकांची मोठी संख्येने उपस्थिती होती.
प्रथमच सिडको हडको परिसरात या भव्य दहिहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता, या दहिहंडी महोत्सवात नांदेड शहरातील व जिल्ह्यातील नामवंत ५ पाच दहिहंडी मंडळ सहभागी झाले होते,यात जय बजरंग मंडळ नांदेड,सिता गणेश मंडळ, पंचशिल व सांस्कृतिक व युवा मंडळ चोफाळा यांनी सहभाग घेतला होता. यात सहभागी झालेल्या मंडळांनी सलामी दिल्यानंतर जय बजरंग मंडळ वडारवाडा नांदेड यांनी दहिहंडी फोडून प्रथम पारितोषिक ५१ हजार पटकिवले.
या सोहळ्याला कार्यक्रमास मराठी सिनेमा अभिनेत्री प्राजक्ता माळी व नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख,मनपा विरोधी पक्षनेते दिपक सिंह रावत, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता ताई देवरे,प्रविण साले, सभापती आनंदराव पाटील शिंदे, बालाजी बच्चेवार, नगरसेविका इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे, सौ बेबीताई गुपीले, माजी नगरसेवक राजू गोरे,ऊमरेकर, मिलिंद देशमुख,अँड दिलीप ठाकूर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते, यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता ताई देवरे यांनी मार्गदर्शन पर भाषणे केली यात महोत्सव साजरा करणारे युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्तुती केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व युवा शक्ती मित्र मंडळ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे,तर सुत्रसंचलन प्रियंका मनाठकर,दिंगा पाटील यांनी केले.दहिहंडी महोत्सव प्रसंगी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.