विधानसभा निवडणुकीत इतरांच्या दावणीला पक्ष उभा कराणाऱ्यानी आपली "ताकद" किती ते पहावे -NNL

आ.राजूरकर यांना केरबा पाटील यांचा सल्ला



नांदेड| लोहा कंधार मतदारसंघात गेल्या ४० वर्षा पासून एकदाही काँग्रेसचा आमदार निवडून आला नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधले जाते. जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधासाठी काँग्रेस पक्षांची वाताहत करण्याच्या नेतृत्वाने आधी पक्ष मजबूत करा नंतर आ.श्यामसुंदर शिंदे यांना पंधरा वर्षे याच पदावर ठेवण्याचे मंगेरीलाचे स्वप्न बघा असा सणसणीत टोला लोहा कृउबा समितीचे संचालक केरबा पाटील वडवळे कापसीकर यांनी आ.राजूरकर यांना लगावला आहे.

कापसी बु. येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे  आ.अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. यावेळी आ.राजूरकर यांनी आ.श्यामसुंदर शिंदे यांना १५ वर्ष तुम्हीच आमदार राहा आम्ही तुमच्या पाठीशी असे आश्वासित केले. त्यावर लोहा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खा.चिखलीकर यांचे कट्टर समर्थक केरबा पाटील वडवळे कापसीकर यांनी खरपूस समाचार घेतला.

लोहा कंधार मतदार संघात १९८५ नंतर एकदाही काँग्रेसचा आमदार निवडून आला नाही अलीकडच्या वीस वर्षात तर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने या मतदारसंघात कधी शंकरअण्णा धोंडगे, कधी रोहिदासव चव्हाण, कधी हरीहरराव भोसीकर, कधी ऍड मुक्तेश्वर धोंडगे तर कधी, आ.राजूरकर यांचा जाहीरपणे उद्धार करणारे अरविंद नळगे यांच्या दावणीला काँग्रेस पक्ष बांधला. त्याचा परिणाम पक्षावर काय झालं याचे चिंतन आधी करा. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना केवळ सहा हजार मते मिळाली. किती ताकद आहे. 

आ.अमरभाऊ आपल्या काँग्रेस पक्षाची आ.श्यामसुंदर शिंदे हे श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण यांचे कार्यकर्ते होते ही बाब खरी आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण झाल्यानंतर आ.श्यामसुंदर शिंदे व कुटुंबियांचे जे हाल झाले ते कोणा मुळे तेव्हा "रूळ" कुठे रुतला होता ? या विधानसभा निवडणुकीत आ.शिंदे पराभूत व्हावे म्हणून आपण व आपल्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पण फक्त आणि फक्त खा.चिखलीकर साहेबांच्या मुळेच श्यामसुंदर शिंदे हे आमदार झाले आहेत हे अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. पाऊणे दोन वर्षात आ.शिंदे यांना एकही नवीन प्रमुख कार्यकर्ता जोडता आला नाही. आयजीच्या जीवावर बायजी उद्धार अशी अवस्था आ.शिंदे यांची तर दुसरीकडे आपल्या पक्षाची दोन्ही तालुक्यात कशी वाताहत झाली आहे. 

निवडणूक आली की कार्यकर्ते आठवणाऱ्या आपल्या सारख्या नेत्यांनी खा.चिखलीकर साहेबांच्या  विरोधात बोलल्या मुळेच प्रसिद्धी मिळते.  आ.श्यामसुंदर शिंदे यांना १५ वर्ष आमदार करण्याच्या मंगेरीलाल स्वप्न पाहण्या ऐवजी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दर निवडणुकीत इतरांच्या दावणीला बांधणे सोडून द्या. त्यांना आधी सन्मान द्या, पक्षाचे संघटन बघा नंतर १५वर्षाचे स्वप्न पहा असा खरपूस समाचार केरबा पाटील वडवळे कापसीकर यांनी आ.राजूरकर यांचा घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी