चिखली येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

किनवट|
एका अल्पवयीन मुस्लिम मुलीवर तिच्याच चुलत भावाने वाईट नजर ठेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील मौजे चिखली येथे मंगळवारी (दि.28) दुपारी तीन वाजता घडली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध किनवट पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, किनवट पो.स्टे.हद्दीतील मौजे चिखली येथील 17 वर्षीय एका मुस्लिम मुलीस मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तिचा चुलत भाऊ शेख बबलू शेख हसन याने मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने वाईट हेतू मनात ठेऊन फिर्यादी मुलीच्या घरी आला आणि मुलीच्या अंगास हात लावत स्वत:च्या पॅन्टची चैन काढून “ इधर देख, इधर देख” म्हणत अश्लिल इशारे करीत विनयभंग केल्याची फिर्याद सदर मुलीने किनवट पो.स्टे.ला दिली. यावरून गुरनं.250/20 कलम 354 (अ) व सह कलम 12 पोक्सो कायद्याप्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राहुलकुमार भोळ हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी